आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यात रथ ओढण्याचा मान यंदा आळंदीतील प्रगतशील शेतकरी हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीला मिळाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा व बैलजोड समितीची बैठक समाधी मंदिरातील सभागृहात पार पडली. यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

बैलजोड समितीचे सदस्य तथा विद्यमान नगरसेवक रामदास भोसले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. आषाढी वारीतील रथ ओढण्याचा मान हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे रानवडे कुटुंबीयांच्या बैलजोडीची निवड झाल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात रथ ओढण्याचा मान मिळणे ही मोठी गौरवाची बाब मानली जाते.





















Join Our Whatsapp Group