पिंपरी (Pclive7.com):- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या 2026-2027 या कार्यकाळासाठी अशोक गोरख खरात यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवारी (दि.17 मे) काळभोर नगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान मावळत्या अध्यक्षा विनाताई सोनवलकर यांनी भूषविले.

यावेळी मावळत्या अध्यक्षा विनाताई सोनवलकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक खरात यांच्याकडे सुपूर्त केली. आगामी अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.

जेवण व्यवस्था समिती प्रमुखपदी बिभीषण घोडके, बॅनर व्यवस्था समिती प्रमुखपदी गणेश खरात, सोशल मीडिया समिती प्रमुखपदी विठ्ठल देवकाते, व्यासपीठ व बैठक व्यवस्था समिती प्रमुखपदी महावीर काळे सर, फटाके व आतिषबाजी समिती प्रमुखपदी अशोक खरात, कार्यक्रम पत्रिका व पत्रक व्यवस्था प्रमुखपदी राजाभाऊ दुर्गे, मिरवणूक व्यवस्था प्रमुखपदी अरुण पाडुळे, सत्कार समिती प्रमुखपदी आशाताई काळे, झेंडे व्यवस्थापन समिती प्रमुखपदी संजय नाईकवाडे, पुरस्कार्थी निवड समिती प्रमुखपदी संतोष पांढरे तर अहिल्यादेवी स्मारकाजवळील सत्कार समिती प्रमुखपदी रेखा दूधभाते यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला विनाताई सोनवलकर, अशोक खरात, राजाभाऊ दुर्गे, धनंजय तानले, महावीर काळे, संतोष पांढरे, अरुण पाडुळे, आशा काळे, सोनाताई गडदे, रेखा दूधभाते, गणेश खरात, विठ्ठल देवकाते, नरेंद्र चऱ्हाटे, बिभीषण घोडके, सुरेश चौधरी, संजय नाईकवाडे, शंकर दातीर, हिराकांत गाडेकर, नवनाथ देवकाते यांच्यासह धनगर समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




















Join Our Whatsapp Group