पिंपरी (Pclive7.com):- अखेर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसला तब्बल पाच महिन्यांनंतर नवा शहराध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी याबाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शहराध्यक्ष कैलास कदम यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहराध्यक्षपद रिक्त होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत शहर संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

नरेंद्र बनसोडे हे पक्ष संघटनेत सक्रिय आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Tags: Narendra Bansode




















Join Our Whatsapp Group