पिंपरी (Pclive7.com):- श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त कै. अखिल शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ आरोग्य, नेत्र चिकित्सा शिबीर व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा ४६० जणांनी लाभ घेतला.
आरोग्य शिबिराचे उदघाटन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी शंकर देशमुख, कांतीलाल कोमट, नंदू लुणावत, देवेश निगुरकर, शरद लुणावत, निखिल लुणावत, सचिन लोढा, विजय लुणावत, अशोक नहार, अशोक कर्णावट, स्नेहल लुणावत, पोपट आरे, डॉ. गणेश आंबिके, रमेश रबडे, संदीप कांकरिया, प्रकाश मिर्जापूरे, उदय कवी, शरद पुराणिक, राजू शिवतारे, नटवरलाल दुग्गड आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांची निगा राखणे उत्तम आरोग्यासाठी फायद्याचे ठरते, या उद्देशातून नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी देखील करण्यात आली. ज्या रुग्णांना चष्म्यांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी डॉ. मयुरेश्वर भोसकर, डॉ. हेमंत कुंडले, डॉ. सुभाष मुनोत, डॉ. सरोज आंबिके यांनी केली. तर डॉ. सौरभ चावरे, डॉ. प्रमोद चाळखे यांनी नेत्र तपासणी केली.
मागील आठ दिवसांपासून श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सुरु असून महोत्सवात दररोज विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता चंद्रशेखर रवडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा करण्यात आली.
महापूजा झाल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता श्रीमोरया गोसावी चरित्र पठण करण्यात आले. यामध्ये स्थानिक पुरुष, महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर ब्राह्मणस्पती सूक्त मंडल करण्यात आले. याचे संयोजन वल्लभ मुंडले गुरुजी, वेदपाठशाळा, तंडोली व चिंचवड ब्रह्मवृंद यांनी केले. दुपारी तीन वाजता सिद्धकला भजनी मंडळ-कलावती माता यांनी भजनसेवा केली. यानंतर हभप शंकर शेवाळे महाराज यांचे श्री चिंतामणी महाराज व श्री तुकाराम महाराज भेट विषयावर व्याख्यान झाले. रात्री आठ वाजता सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू हा संगीताचा कार्यक्रम झाला.





















Join Our Whatsapp Group