पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री करंडक स्पर्धा (सीएम चषक) भव्य दिव्य रांगोळी व चित्र कला स्पर्धा पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शानाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या उपस्थितीत पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील प्रत्येक प्रभागात रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सुमारे १५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांनी अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यामध्ये गालिचे, ठिपक्यांची रांगोळी, पेंटेत रांगोळी, बेटी बचाव रांगोळी, सेव्ह वॉटर, वृक्ष संवर्धन रांगोळी अशा अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन स्पर्धांची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद व मित्र परिवार उपस्थित होते. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा अंतर्गत प्रभागप्रमाणे सर्व नगरसेवक, स्वीकृत सदस्य, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या प्रभागत स्पर्धा घेऊन लहान-थोरांना एक वेगळं व्यासपीठ मिळवून दिले. महिलांना, लहान मुला-मुलींना या स्पर्धेत रांगोळी काढताना तसेच चित्र काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, अक्षय घोळवे, शीतल घोळवे, संतोष अढागळे, लवलीना कसबे यांनी काम पाहिले.



















Join Our Whatsapp Group