
पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीत एका हॉटेलचे कुलूप तोडून ६० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अधिकारीराव विश्वासराव भोसले (वय ५३, रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे शिवकल्याण भोजनालय हे हॉटेल एम.एम. चौक, काळेवाडी येथे आहे. २९ जून रोजी रात्री अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील तसेच गल्ल्यातील एकूण अंदाजे ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेची तक्रार काळेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

या प्रकरणी शंकर सोपान सगर (वय १८, रा. जगताप नगर, थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group