पिंपरी (Pclive7.com):- औंध-रावेत बीआरटी मार्गावारील जगताप डेअरी, साई चौक येथील श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावरील काळेवाडीकडून औंधकडे जाणारा एकेरी मार्ग सोमवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक नाना काटे यांनी दिली.
यासंदर्भात नाना काटे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा एकेरी मार्ग सुरू करण्याची मागणी केली. हा मार्ग सोमवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन खाडे यांनी दिले असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.
या पुलाला श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी देखील यापूर्वी नाना काटे यांनी केली होती. त्यानुसार या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे काटे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group