याविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, निगडी पोलीस ठाण्यामध्ये काही सायकल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तपास करीत असताना पोलीस कर्मचारी रमेश मावसकर यांना खबर मिळाली की, अंकुश चौकाजवळ, निगडी नाक्याजवळ व चिकन चौकाजवळ काही मुले संशयीतरीत्या थांबली आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. ही सर्व मुले साधारण १०ज ते १२ वर्ष वयोगटातील आहेत.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक एल.एन.सोनवणे, कर्मचारी किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, संदिप पाटील, रमेश मावसकर, राहुल मिसाळ, विजय बोडके, विलास केकाण, सोमनाथ दिवटे, गणेश शिंदे, सतीष ढोले, मितेश यादव यांनी ही कारवाई केली.
महापालिकेच्या ‘स्मार्ट सायकल’ही चोरल्या
मुलांनी ‘क्लासेस’च्या बाहेर लावलेल्या सायकलला ‘टार्गेट’ केले होते. बऱ्याच वेळा सायकल पार्क केलेल्या ठिकाणाहून ‘लॉक’ तोडून सायकल चोरी केली जात होती. ज्या सायकलचे ‘लॉक’ हे तोडणे अशक्य होते. त्या सायकलला मात्र, दोघे-तिघे मिळून ते उचलून घेऊन जात व निर्जनस्थळी नेऊन ‘लॉक’ तोडत होते. यामध्ये त्यांनी गेल्या चार महिन्यात तब्बल ५६ सायकल या निगडी आसपासच्या परिसरातून चोरल्या होत्या. यामध्ये महापालिकेच्या ‘स्मार्ट सायकल’चा देखील समावेश होता. समावेश होता. असा एकूण ४ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीच्या काही सायकल विकल्याचेही कबुल केले आहे.






















Join Our Whatsapp Group