पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखीचा परतीचा प्रवास सुरू असताना रविवारी (दि.९ ऑगस्ट) निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली वारकरी बांधवांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अन्नदान व चहा-नाश्ता वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या पुढाकाराने हा सेवा उपक्रम पार पडला.

पालखीचे निगडी येथे आगमन झाल्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सुमारे तीन हजार वारकरी बांधवांना चहा, नाश्ता, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावली.

वारकरी सेवेला धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी बांधवांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालखीच्या परतीच्या प्रवासात थकलेल्या वारकऱ्यांना अल्पोपहार व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.

या अन्नदान उपक्रमासाठी बबन शिवणेकर, केशव वाघमारे, तानाजी जांभूळकर, भरत राठोड, राकेश सिंग, अनिल शिर्के, बबनराव दळवी, जयदेव भुवड, गौरव रोधाळे, सुरेश चव्हाण, वैशाली पाठणेकर, दादा हाठले, भाई मिस्त्री, अजय पेडणेकर, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी आणि अक्रम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

वारकरी बांधवांची सेवा हीच खरी भक्ती मानून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिन काळभोर यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी बांधवांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी नागरिक, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून सेवा उपक्रम राबविले जात आहेत. निगडीतील या उपक्रमातूनही ‘वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा’ या भावनेचा प्रत्यय आला.






















Join Our Whatsapp Group