पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील जय हनुमान श्री शनी सेवा ट्रस्टच्या वतीने शनी अमावस्या निमित्त विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. ट्रस्ट मार्फत दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ९८ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये भाग घेतला.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय गायके हे वर्षातून २ वेळा रक्तदान शिबीर व विविध संस्थांसाठी मदतनिधी जमा करून देतात. तसेच गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळवून देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. महाविद्यालयीन जीवनापासून समाजसेवेची आवड निर्माण झालेले संजय गायके हे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे काही काळ विद्यापीठ प्रतिनिधी होते. त्यावेळी त्यांनी विद्यालयाच्या आवारामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्ध पुतळा बसविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. पुतळा समितीचे ते अध्यक्ष होते. इंदुरी गावातील दादू इंदुरीकर यांचे अनाथ संस्थेस तसेच ममता अंध संस्था, माई अंध संस्था देहूरोड येथे लहान मुलांसाठी मिसळ, भेळ पार्टीचे आयोजन करून त्यांच्या आनंदात सहभागी होतात.
शनी आमावस्येनिमित्त भूगाव येथील मानव्य एच आय व्ही बाधित मुलांची संगोपन संस्थेस अन्नधान्य, वस्तू, रोख स्वरुपात मदत करण्यात आली. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते या मुलांना ही भेट देण्यात आली. यावेळी प्राधिकरण समितीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, सचिन साठे, प्रवीण हिरवे, सोनू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group