पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या बुधवारी (दि.९) रोजी होणार आहे. यानिमित्त प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस महापौर राहुल जाधव, नगरसेवक नामदेव ढाके, संदीप वाघेरे, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजना प्रकल्पातील चऱ्होली, रावेत, आकुर्डी, पिंपरी, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे ई-भूमीपूजन होणार आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार शहरातील पाच रस्त्यांच्या कामाचे देखील ई-भूमीपूजन होईल. स्मार्ट सिटीअंतर्गत सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट किऑस्क व व्हेरिएबल मॅसेज डिसप्ले सोल्युशनबाबत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामाचा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे, अशी माहिती पक्षनेते पवार यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group