रावेत, किवळे व मामुर्डी परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा ‘विशेष संवाद’
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १६ (रावेत, किवळे, मामुर्डी) येथील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत थेट आमदारांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शासनाच्या योजना, शासकीय दाखले, रेशनकार्ड, वीज, पाणी, ड्रेनेज, महापालिकेशी संबंधित तक्रारी तसेच इतर जनसामान्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन व समस्या निवारण करण्यात येणार आहे.
या वेळी महापालिकेचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारींसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
स्थळ : समीर लॉन्स, रावेत, पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आमदार शंकरभाऊ जगताप यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group