पिंपरी (Pclive7.com):- गुंतवणुकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी व इतर नागरिकांची तब्बल १ कोटी ३२ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना काळेवाडी फाटा परिसरात २९ डिसेंबर २०२१ रोजी घडली.

गजानन रमाकांत कवटिकवार (वय ३४, रा. आदित्य रिजेन्सी, मोहननगर, बालेवाडी, पुणे; मूळ रा. लोहा, जि. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष बळीराम जाधव (वय ४२, रा. शिवतेज पार्क, विवेकानंद नगर, नवी सांगवी, पुणे) यांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सप्तगिरी रिलिटी कार्यालयात गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी मदत आणि जुन्या नोटा बदलणे अशी कारणे सांगून विश्वासात घेतले. मोबदल्यात दामदुप्पट रकमेचे दिलेले बँकेचे चेक बाऊन्स झाले. आरोपीने फिर्यादींचे २० लाख २५ हजार आणि इतर गुंतवणूकदारांचे १ कोटी १२ लाख ६८ हजार रुपये लाटले. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group