तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या रागातून वराळे येथील शिक्षक कॉलनी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 30 ऑगस्ट) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एस.डी. फोटो स्टुडिओ, शिक्षक कॉलनी, वराळे येथे ही घटना घडली. फिर्यादी सुभाष विष्णू शिंगाडे (वय 50, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तक्रार दिली आहे.
मृत प्रशांत शिंगाडे हा आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी थांबला असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी कोयत्याने डोक्यावर, हातावर, छातीवर व पाठीवर वार केले. तसेच डोक्यात मोठे दगड मारून त्याचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी साहिल पांडुरंग समुखराव (वय 18), सुनील पांडुरंग समुखराव (वय 24), यश दीपक लोखंडे (वय 19), रोहन हनुमंत सावंत (वय 19), हेमराज गौतम सोनवणे (वय 28), रोशन साव (वय 21) तसेच दोन विधीसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group