पिंपरी (Pclive7.com):- शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित कलाटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान खासदार सुळे यांनी कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संबंधित यंत्रणांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन सत्य समोर आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कलाटे कुटुंबीयांनी आपल्या भावना व मागण्या खासदार सुळे यांच्यासमोर मांडल्या. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.




















Join Our Whatsapp Group