भोसरी (Pclive7.com):- हवेली तालुक्यातील बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या हवेली तालुका संचालकपदी मनोज दत्तात्रय मोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील बैलगाडा मालक, शेतकरी आणि शर्यतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या बैलगाडा शर्यतींचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज मोरे यांच्यावर संघटनेच्या माध्यमातून बैलगाडा मालक, शेतकरी तसेच शर्यतप्रेमींच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याची आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हवेली तालुक्याला अखिल भारतीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळाल्याने ही निवड तालुक्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. मनोज मोरे यांच्या निवडीमुळे बैलगाडा शर्यतींच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, बैलगाडा मालक, शेतकरी आणि बैलगाडा शर्यतप्रेमींनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group