चिंचवड (Pclive7.com):- बिजलीनगर येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चिंचवड, पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. महावितरणच्या संबंधित पथकाकडून घटनास्थळी पाहणी करून परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

वीजपुरवठा बंद असल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत अद्याप निश्चित वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट देण्यात येईल.




















Join Our Whatsapp Group