दापोडी (Pclive7.com):- शिक्षक दिनाचे औचित्य साधून सी. के. गोयल कॉलेज, दापोडी व प्रबोधन प्रतिष्ठान, दापोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १०० शिक्षकांच्या विशेष सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी ग्रंथ भेट देऊन १०० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
यावेळी प्रमुख वक्ते मा. सूर्यकांत भोसले (माजी क्लास वन अधिकारी, पुणे) यांनी “शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षकांची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सोमनाथ दडस (सी. के. गोयल कॉलेज, दापोडी) यांनी भूषविले. तर स्वागताध्यक्ष मा. गोरख ब्राम्हणे सर (एम.ए., बी.एड.), अध्यक्ष, प्रबोधन प्रतिष्ठान, दापोडी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

“शिक्षक म्हणजे आयुष्याच्या वाटेवर दिशा देणारा दीपस्तंभ आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय.”– डॉ. धम्मरत्न गायकवाड
या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित केल्याबद्दल सी. के. गोयल कॉलेजचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार, तसेच मा. गोरख ब्राम्हणे सर आणि प्रबोधन प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, असे डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group