पिंपरी (Pclive7.com):- कृष्णानगर येथील जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव आज शनिवार, दि.०५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सेक्टर २०, मथुरा चौक, कृष्णानगर येथे रंगणार आहे.

यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे २,५१,५५१ रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले असून, त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. याशिवाय आकर्षक लाईटिंग, साऊंड सिस्टीम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट व मालिकांमधील लोकप्रिय सिने अभिनेत्री अभिज्ञा भावे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.

या उत्सवाचे आयोजन व नियोजन युवानेते सचिन सानप आणि नगरसेविका रिटा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कृष्णानगरमधील दहीहंडी उत्सव उत्साह, जल्लोष आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा होणार असल्याने परिसरात सध्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















Join Our Whatsapp Group