पिंपरी (Pclive7.com):- शिक्षक दिनानिमित्त युवासेना चिंचवड विधानसभा यांच्या वतीने पुनावळे गावातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक १०३ येथे विशेष कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

युवासेना चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख सागर शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या धावपळीच्या जीवनातही माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आठवण ठेवून त्यांचा सन्मान केल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. “तुमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांनी आमची आठवण काढली, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे,” अशा भावना शिक्षकांनी व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी किशोर गायकवाड, ज्योती संजय तापकीर, प्रमोदिनी शशिकांत ब्राह्मणकर, योजना अजित काटे, सूर्यभान बाळू तिकोने, शीला कल्याण खामकर, रुपाली संजय कड, गीता सुभाष खोपे, जयश्री प्रशांत शिरवले, लक्ष्मण शिवाजी दरेकर, पूजा गोविंद कदम, अश्विनी वामनराव पाटील, चेतना पोपट सोनावले, वैशाली छगनराव सपकळ, शैला अरविंद जांबले, शैला श्रीकांत जाधव, माधुरी हरिभाऊ राजदेव, कोमल गणेश अभंग, अमरजा भीमाशंकर घोगरे, वृषाली शिवाजी मोहिते, सुभाष महाजन नलावडे तसेच शिक्षक, शिक्षिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group