पिंपरी (Pclive7.com):- मोबाइलवर ट्रॅफिक ई-चलन आल्याचे भासवून एका अज्ञात सायबर चोरट्याने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ६ लाख ८८ हजार रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

हॉट्स ॲपवर इ-चलन फाइल पाठविणाऱ्या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदल नथुनी चौहान (वय ४४, रा. ज्योती इंग्लिश स्कूल शेजारी, शिवशंभू निवास, नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादीच्या व्हॉट्स ॲपवर इ-चलन असल्याचे भासवून एक एपीके फाइल पाठवली. फिर्यादीने ती फाइल उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाइलचा बेकायदेशीर ॲक्सेस मिळवला. त्यानंतर फिर्यादीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून परस्पर तब्बल ६ लाख ८८ हजार रुपये ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली.




















Join Our Whatsapp Group