पिंपरी (Pclive7.com):- सोसायटीतील नागरिकांना पाळीव कुत्रा चावू शकतो याची कल्पना असतानाही कुत्रा मोकळा सोडला. या पाळीव कुत्र्याने दोन ज्येष्ठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवार रात्री ८:३० वाजता चोली हद्दीतील जेनेसीस सोसायटी, वडमुखवाडी येथे घडली.

आरोपी विक्रम रामस्वरूप बक्षी (वय ५८, रा. जेनेसीस सोसायटी, वडमुखवाडी, ता. हवेली, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश केशव पवार (वय ७०, रा. जेनेसीस सोसायटी, वडमुखवाडी) यांनी फिर्याद नोंदवली आहे. आरोपी बक्षी यांनी पाळलेले कुत्रे आक्रमक असूनही त्यांनी कोणतीही काळजी घेतली नाही.

वारंवार समज देऊनही त्यांनी कुत्रे इमारतीच्या परिसरात मोकळे सोडले. गुरुवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचे शेजारी नसिब नारायण ठाकूर (वय ६७) सोसायटीत असताना मोकळ्या सोडलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत दोघांनाही चावा घेऊन जखमी केले. या प्रकरणाचा तपास दिघी पोलीस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group