पिंपरी (Pclive7.com):- मकर संक्रांतीच्या काळात शहरभर अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. हे पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला चिनी किंवा नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांज्यामुळे गळा कापून मागील वर्षी याच काळात डॉक्टर तरुणीचा नाशिक फाटा येते अपघात होऊन मृत्यू झाला होता. तसेच काळेवाडीत आणि पुण्यात काही तरुण व बालके चिनी मांजा कापल्यामुळे जखमी झाली होती. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील चायनिज व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नूसार कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पोलिस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन केली आहे.
संक्रांतीच्या काळात देशात ठिकठिकाणी पतंग उडविण्याच्या स्पर्धा, महोत्सव आयोजित केले जातात. उत्साही युवक व आबाल वृध्द देखील यात भाग घेताना दिसतात. परंतू अनेक ठिकाणी बंदी असणारा चायनिज मांजा व नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होऊन मृत पावतात. तसेच शहरी भागात दुचाकी चालकांचे व पादचाऱ्यांचे अपघात होतात. असे अपघात झाल्यानंतरच प्रशासन व पोलिस कारवाई करताना दिसतात. चायनिज व नायलॉनचा मांजा मानवी जीवितास व पर्यावरणास हानीकारक असल्यामुळे यावर उच्च न्यायालयाने बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रीय हरित लवादाने केली होती. यास अनुसरुन सर्वोच्च न्यायालयाने 2017 पासून नायलॉन व चायनिज मांजावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पोलिस व प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group