निगडी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंध व दिव्यांग बांधवांसाठी स्नेहभोजन आणि छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात सुमारे दोनशे अंध व्यक्तींनी उपस्थिती लावली. उपस्थितांसाठी अन्नदान व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू दिव्यांगांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम सचिन काळभोर (भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता) यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवकुमार बायस (क्षत्रिय राजपूत संघटना, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष), प्रविण पायाळ, गौरव रौधाळे, राकेश सिंह, राजू लक्ष्मण काळभोर, उद्योजक बंडू भाऊ लवगे, मुन्ना बेग, फिरोज शेख, सचिन शिंदे, जयदेव भुवड, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी, रफिक शेख, अविनाश साळवे, बबन दळवी आणि अफसर मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील गरजू आणि दिव्यांग बांधवांप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणाचे समाजोपयोगी कार्यात रूपांतर करून अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

















Join Our Whatsapp Group