पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील केएसबी चौकात टेल्को गेटसमोर ट्रक आणि क्रेनचे मोठमोठे टायर वाहून नेणारा एक टेम्पो अचानक पलटी झाल्याची घटना घडली. टेम्पो पलटी झाल्यानंतर त्यामधील जड टायर रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी रस्त्यावर विखुरलेले टायर बाजूला जमा केले तसेच पलटी झालेला टेम्पो सरळ करण्यासाठीही मदत केली. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्यापासून बचाव झाला.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टेम्पोचालकाने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केल्याने अनर्थ टळला. घटनेनंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.



















Join Our Whatsapp Group