
भोसरी (Pclive7.com):- जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून मेडीकव्हर हॉस्पिटल, भोसरी यांच्या वतीने रविवारी (दि.२७) सकाळी भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक काळजी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या वॉकेथॉनमध्ये रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, डिस्ट्रिक्ट ३१३१च्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. योगेश गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक रोटेरियन आणि सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. समाजाच्या आरोग्यासाठी रोटरी क्लब करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मेडीकव्हर ग्रुपच्या वतीने अध्यक्ष रो. डॉ. योगेश गाडेकर तसेच रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या संपूर्ण टीमचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना रो. डॉ. योगेश गाडेकर म्हणाले, “निरोगी हृदय हाच निरोगी जीवनाचा पाया आहे. हृदयाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असून समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी रोटरी क्लब नेहमीच पुढाकार घेत राहील.”

या वॉकेथॉनमध्ये मेडीकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक तसेच आरोग्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमातून नियमित व्यायाम, चालणे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group