पिंपरी (Pclive7.com):- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वल्लभनगर एसटी आगार येथून साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी विशेष बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या बससेवेच्या माध्यमातून भविकांना एकाच प्रवासात राज्यातील प्रमुख शक्तिपीठांचे दर्शन घेता येणार आहे.

या यात्रेत भविकांना महालक्ष्मी मंदिर, (कोल्हापूर), तुळजाभवानी मंदिर, (तुळजापूर) आणि माता रेणूका देवी (माहूरगड) या प्रमुख शक्तीपीठांचे दर्शन घेता येईल. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०१ वाजता वल्लभनगर आगारातून बसचे प्रस्थान होणार आहे. त्याच दिवशी रात्री ९.२९ वाजता माहूरगड येथे बस पोहोचले.

प्रवासाचा मार्ग स्वारगेट, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, अर्धापूर, वारंगा फाटा, हदगाव, उमरखेड, महागाव, माहूरगड असा बसचा मार्ग असेल. भविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अनुभवी चालक वाहकांची नियुक्ती केली आहे. प्रवासादरम्यान भक्तांच्या सोयी सुविधांची विशेष काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.



















Join Our Whatsapp Group