आळंदी (Pclive7.com):- इंदिरा एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य पुष्पसजावट करण्यात आली आहे. विविधरंगी सुवासिक फुले, शोभिवंत फुलांच्या माळा आणि कलात्मक रचनांनी संपूर्ण मंदिर परिसर सजविण्यात आला असून, या देखण्या सजावटीमुळे मंदिराच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

एकादशीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने माउलींच्या दर्शनासाठी आळंदीत दाखल झाले आहेत. मंदिरातील मनोहारी पुष्पसजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मंदिर परिसरात माउली-ज्ञानोबांच्या जयघोषाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. समाधी मंदिरातील आकर्षक पुष्पसजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.


















Join Our Whatsapp Group