पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगर परिसरात फुटपाथवर एका ५० वर्षीय व्यक्तीची सिमेंटच्या चौकोनी फरशीने डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

प्रभाकर कुंडलिक सरकटे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यानच्या फुटपाथवर ही घटना घडली.
फिर्यादी गणेश प्रभाकर सरकटे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून प्रभाकर सरकटे यांच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी फरशीने मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात रोहित ऊर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे, अर्णव ऊर्फ अरव लोकेश ऊर्फ आरब्या, प्रणित प्रशांत निकाळजे आणि सचिन राम साबळे अशी आरोपींची नावे नमूद करण्यात आली आहेत. यापैकी रोहित धोत्रे, प्रणित निकाळजे आणि सचिन साबळे यांना अटक करण्यात आली असून अर्णव ऊर्फ अरव याचा तपास सुरू आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडे हे करीत आहेत.



















Join Our Whatsapp Group