पिंपरी (Pclive7.com):- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि.१९ जानेवारी रोजी नगरसेविका निर्मला संजय कुटे सोशल फाउंडेशनच्या पाठपुराव्यानुसार निर्मला कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गोवर व रुबेला (MR) लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, लोकमतचे पत्रकार शिवप्रसाद डांगे, चिंधा कुटे, बाळासाहेब कुटे, चिंतामन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर लसीकरण मोहीमेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. परिसरातील अनेक मुलांना यावेळी लसीकरण करण्यात आले. नागरीकांच्या मागणीनुसार उद्या रविवारी दि.२० रोजी देखील नगरसेविका निर्मला कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सकाळी १० ते २ या वेळेत वय वर्ष ९ महीने ते १५ वर्षा मधिल मुला, मुलींसाठी लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील सर्व जागृक पालकांनी आपल्या बालकांना उद्या लासिकरण करून घेण्याचे अावाहन निर्मला कुटे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group