पिंपरी (Pclive7.com):- शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आकुर्डी भागातील ५८ महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शनची प्रमाणपत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते महिलांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी संजय गांधी समितीचे सदस्य आप्पा कुटे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे तहसिलदार राधिका बारटक्के, नगरसेविका वैशाली काळभोर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नागरिकांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राची लोकधारा हि संगीतरजनी झाली.






















Join Our Whatsapp Group