पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी खासगीकरण आणि सल्लागार नेमून मलिदा लाटण्यावर टपून आहेत. आता भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. राष्ट्रवादीतून भाजपात आलेले ‘चोर’ पालिकेला चाटून-पुसून खात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे.
यासंदर्भात उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या सत्तापिपासू नगरसेवकांना नागरिकांनी विश्वासाने निवडून दिले. आता त्यांनीच महापालिकेत भ्रष्टाचाराची बिजे रोवली आहेत. दोन वर्षाच्या कार्यकाळात वाढीव खर्चाच्या निविदा काढून टक्केवारी लाटली जात आहे. नगरसेवकच ठेकेदारांचे भागीदार बनले आहेत.
त्याचाच भाग म्हणजे भोसरीतील रुग्णालय खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. त्यामागे भाजप पदाधिका-यांचा आणि नगरसेवकांचा स्वार्थ दडला आहे. राष्ट्रवादीतून भाजपत आलेली नगरसेवक चोर मंडळी महापालिकेला चाटून-पुसून खात आहेत. आपण लक्ष घालून भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा ठराव विखंडीत करावा, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






















Join Our Whatsapp Group