मुक्ता टिळक म्हणाल्या, की आमच्याकडे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेत असतो. त्यामुळे पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडेल. परंतु असे असले, तरी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पक्ष उमेदवारी संदर्भातील निर्णय जाहीर करणार नाही. वेळ आली आणि पक्षाने संधी दिली, तर नक्की निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कसबा मतदारसंघातून सध्या पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आमदार आहेत. मागील २० वर्षांपासून ते या मतदार संघातून निवडणून येत आहेत. परंतु, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास ते इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले.






















Join Our Whatsapp Group