पिंपरी (Pclive7.com):- राहत्या घरात विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली. विनोद ज्ञानेश्वर पाटील (वय २१, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास विनोद यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी (ता.२०) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.






















Join Our Whatsapp Group