पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत मानधनावरील पदांची भरती करण्यापेक्षा स्थायी अस्थापनेवरील पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
संदीप वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका आता ‘ब’ वर्गामध्ये दाखल झालेली आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा नियम २०१६ अन्वये महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या ज्या भूमिपुत्राचे ५०० चौ.मीटर पासूनचे पुढील क्षेत्र, MIDC, संरक्षण क्षेत्राकरिता किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी घेण्यात आले. अशा सर्व पिंपरी चिंचवडमधील बाधितांच्या वारसदारांना नव्या आकृतीबंधाद्वारे नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असलेले राखीव आरक्षणाव्यतिरिक्त ज्यादा २० टक्के अतिरिक्त आरक्षण राहील. असा नियम असताना देखील मागील काही महिन्यापूर्वीच्या १५१ इंजिनिअर भरती तसेच शिक्षक भरतीमध्ये या नियमांचा विचार केला गेला नाही. अशी खंत संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली.
आज भूमिपुत्रांवर बेकारीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांना ७ ते ८ आठ हजार रुपयांमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी स्वीकारावी लागत आहे. शहरातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि जर शासनाकडून आकृतीबंद मंजूर झाल्यानंतर या सर्व बाबींचा विचार केला गेला नाही तर मला न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल असा इशाराही संदीप वाघेरे यांना यावेळी दिला.





















Join Our Whatsapp Group