पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटी अंतर्गत ओल्या कचऱ्यापासुन कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण ६०० लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे व नगरसेविका सौ.शितल नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शिवम सोसायटीत एकूण १०४ सदनिका आहेत.या सोसायटीत दररोज सुमारे १ टन ओला कचरा संकलीत केला जातो. ओला व सुका कचरा वेगळा करून तो सोसायटीतील प्लँटमधे संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्या कचऱ्यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचरा वेगळा होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडून करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. या खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक विठ्ठल नाना काटे व नगरसेविका सौ.शितल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री.विक्रम टिकेकर, श्री.संदीप भोळे, श्री.निलेश अटल, श्री.संजय मुंदडा, श्री.मनोज हरमाळकर श्री.ग्यान ठाकूर, श्री.जितेंद्र हंडा व सोसायटीमधील सभासद आदी उपस्थित होते.
कचऱ्यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते. माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group