सोनाली ही मूळची कराडची होती. ती पुण्यातील झिल महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सोनाली १९ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती.
प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी सोमेश घोडके याने झिल महाविद्यालयाजवळ भाड्याने खोली घेतली होती. तो सोनालीसोबत त्या ठिकणी राहत होता. घर मालकाला त्याने सोनालीबरोबर लग्न झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, सोमेश हा सोनालीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दुसऱ्याच तरुणाशी तिचे प्रेमसंबंध आहेत असा त्याला संशय होता. याच रागातून त्याने सोनालीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
खून केल्यानंतर सोमेश घराला बाहेरून कडी लावून फरार झाला. इमारतीत राहणार्या नागरिकांना घरातून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी घर मालकाला कळवले. त्यावेळी त्यांनी घर उघडून पाहिले असता सोनाली मृतावस्थेत आढळली. सिंहगड पोलीस यातील संशयित आरोपी सोमेश घोडके याचा शोध घेत आहेत






















Join Our Whatsapp Group