पिंपरी (Pclive7.com):- भारतीय वायूसेनेनं आज पहाटे तीन वाजता पाकव्याप्त काश्मिरमध्ये घूसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. या कामगिरीनिमित्त वायूसेनेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीनंही वायूसेनेचं अभिनंदन करत साखर वाटप करून जल्लोष करण्यात आला.
पिंपरीतील शगुन चौक या ठिकाणी वीरबजरंग बल्ली हनुमानाच्या मंदीरात पुष्पहार अर्पण करून शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने फटाके वाजवत जल्लोष करून साखर वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, गोरख पाटील, मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाईसुरेश जोगदंड, आपना वतन संघटनेचे जितेंद्र जुनेजा, शहाजी गाडेकर, तेजस दाखले, प्रदिप दळवी, माऊली जाधव, दत्ता गिरी,रविकिरण घटकार, संदिप खुंटे, सागर शिंदे, दिपक कांबळे, दत्ताभाऊ क्षिरसागर, संतोष हिवाळे, शगुन चौक हॉकार्सचे अध्यक्ष पिंपरी राजेश मायारामन, नारायण खुशलानी, भाग्यश्री मस्के, रत्नप्रभाताई नवगिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group