पुणे (Pclive7.com):- पाकिस्तानच्या आश्रयाखाली भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश ए महंमद संघटनेचे अड्डे भारतीय हवाई दलाने उध्वस्त करून जबरदस्त धडा शिकविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.
पुलवामा येथिल केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, त्यात ४० जवान शहीद झाले. त्या घटनेपासून दहशतवाद्यांना धडा शिकवावा अशी भावना जनतेत निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनादलांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली होती. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेला भारतीय हवाई दलाने जबर धडा शिकविला, असे खासदार शिरोळे यांनी यावेळी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group