पिंपरी (Pclive7.com):- पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसून बॉम्ब हल्ला केल्याचे वृत्त समोर येत आहे. काश्मिरच्या हद्दीत या विमानांनी घुसखोरी केली होती. मात्र भारतीय सैन्याने हा हल्ला परतून लावला आहे. ही विमाने पुन्हा पाकिस्तानात परत गेली असल्याची माहिती समोर येत आहे. पूंछ, राजौरीत पाककडून बॉम्ब टाकले गेल्याचे वृत्त पीटीआयकडून येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मिर येथील प्रवासी विमान थांबवली आहेत. लेह, जम्मू, पठाणकोट, विमानतळांवर हायअलर्ट देण्यात आला आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
























Join Our Whatsapp Group