पिंपरी (Pclive7.com):- गेल्या साडेपाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अनेक विकासकामे मंजूर केलीत. त्यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत. प्रशासकीय त्रुटींमुळे काही कामांना विलंब होत आहे. काही कामांचा डीपीआर तयार होत आहे, अशी सुमारे १५ हजार कोटींची कामे मार्गी लागत आहेत. परंतू कुंभकर्णाप्रमाणे १० वर्षे झोपलेल्या मंडळींनी आता फ्लेक्सबाजी सुरू केलीयं. बैलगाडा शर्यत, विमानतळ, नाशिक महामार्ग अशा प्रश्नांचा नुसता कांगावा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विलास लांडे यांच्यावर नाव न घेता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी नियोजन केल्याप्रमाणे सर्व कामे मार्गी लागत आहेत. मात्र काही मंडळींनी फ्लेक्सबाजी सुरू केलीयं. त्यांनी केलेल्या आरोपांचे मी कुठलेचं उत्तर दिले नाही. हे १० वर्षे झोपून राहिले होते. आता कुंभकर्णाप्रमाणे त्यांना जाग आली आहे. बैलगाडा शर्यत, विमानतळ, चाकण वाहतूक कोंडी, नाशिक महामार्ग अशा प्रश्नांची फ्लेक्सबाजी करून कांगावा सुरू आहे. एवढे दिवस नागरिकांचे प्रश्न त्यांना दिसले नव्हते का, असा प्रश्न सवाल उपस्थित करत विलास लांडे यांचे नाव न घेता खासदार आढळरावांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.






















Join Our Whatsapp Group