पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ (एमपीएससी) च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. स्वाती अच्युत धोंगडे हिचा खुल्या प्रवर्गात मुलीमध्ये राज्यात ४२ वा क्रमांक आला आहे. तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना नाना काटे म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे स्वातीने दाखवून दिलेले आहे. स्वातीचा हा आदर्श अनेक मुलामुलींनी घ्यावा. परिस्तिथीमुळे खचून न जाता आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे पाहावे असे ही आवाहन नाना काटे यांनी केले.
स्वातीच्या घरातील परिस्तिथी अत्यंत हलाकीची आहे, स्वातीचे मुळ गाव मु.पो.कन्हेरवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद हे आहे. सध्या ते काळेवाडी येथे राहतात स्वातीचा जन्म काळेवाडीतच झाला आहे. स्वातीला लहानपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण होते. ही वर्दी आपल्या अंगावर मानाने चढवली जायला हवी असं स्वप्न होत म्हणून स्वातीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. वडील ड्रायवरची नोकरी करतात, आई घरोघरी कामे करती. परंतु आपल्या मुलीची शिक्षणाची आवड बघून, स्वातीची स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, आणि शेवटी स्वातीने आपल्या घरच्याचं स्वप्न पूर्ण करत ती यशस्वी झाली.
स्वातीचे १ ते १० वी पर्यंतचे शिक्षण काळेवाडी येथील तापकीर शाळेत झाले. १२ चे शिक्षण एम.एम.कॉलेज काळेवाडी येथे झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ (एमपीएससी ) चा घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच ८ मार्च २०१९ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये राज्यातील तीन लाख ३० हजार ९०९ उमेदवार आयोगामार्फत घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेसाठी बसले होते. यातून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी १० हजार ३१ उमेदवारांची निवड झाली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी दोन हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले होते. या २ हजार ७६३ उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गात मुलींमध्ये कु. स्वाती धोंगडे हिचा ४२ वा क्रमांक आला आहे.






















Join Our Whatsapp Group