पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज (दि.२७) ही भेट घेण्यात आली.
पिंपरी चिंचवडचे प्रभारी किशोर शिंदे, शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, नाशिर शेख, शहर सचिव रूपेश पटेकर, विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, महिला सचिव सीमा बेलापुरकर आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी यावेळी शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मतदार संघात कुठल्या पक्षाचं काय चाललयं याचा आढावा घेऊन निवडणुकीबद्दल मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत मनसेची काय भूमिका असली पाहिजे याबाबत चर्चा केली. तसेच शिरूरसह मावळ मतदारसंघात कोणत्या उमेदवाराचे काम करायचे..? याबाबत येत्या पाढव्याच्या मेळाव्यात स्पष्ट होईल असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे सचिन चिखले म्हणाले.