मावळ (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले आहेत. त्यांचा रिक्षाचा प्रवास, इस्कॉन मंदिरात हरे राम.. हरे कृष्णाच्या तालावर धरलेला ठेका, लोकलचा प्रवास यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता तर पार्थ पवार प्रचारा दरम्यान भजनात मंत्रमुग्ध झाल्याचे समोर आले आहे. खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना मंदिरात सुरू असलेल्या भजनात चांगलेच रमल्याचे दिसत आहे.
खालापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ पवार हे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. परंतु मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे त्या मंदिरात गेले. आणि टाळ हातात घेत त्यांनी देखील भजनाचा आनंद घेतला. पार्थ पवार हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असनारे सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. पार्थ पवार हे भजन करण्यात रमले असल्याचे पाहताच उपस्थित भजनी मंडळात आणखी उत्साह वाढला.






















Join Our Whatsapp Group