पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात आज दि.८ रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजपर्यंत त्यांच्यासह मावळसाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याचा उद्या मंगळवारी दि.९ रोजी शेवटचा दिवस आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.
मावळ लोकसभा निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज भरण्यास २ एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे आप्पा उर्फ जगदीश शामराव सोनवणे, अपक्ष अमृता अभिजीत आपटे, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भीवाजी महाडीक, अपक्ष धर्मराज यशवंतराव तंतरपाळे, प्रकाश गणपत देशमुख, राकेश प्रभाकर चव्हाण असे एकूण १५ उमेदवारी अर्ज आज दिवसअखेर दाखल झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group