पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथून जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या रॅलीला सुरूवात झाली आहे. यावेळी स्वत: अजित पवार हे या रॅलीत उपस्थित असून पार्थ यांचे बंधू जय पवार हे देखील त्यांच्या सोबत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाचा फुलांचा रथ करण्यात आला आहे.
जोरदार शक्तीप्रदर्शन करत पार्थ पवार यांची रॅली सुरू, थोड्या वेळात करणार उमेदवारी अर्ज दाखल






















Join Our Whatsapp Group