पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली.

खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली.






















Join Our Whatsapp Group