पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात काल सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील सर्व राम मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कासारवाडी येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कासारवाडी येथूल सर्व तरूणांनी श्रीराम यांच्या भव्य मुर्तीच्या मिरवणूकीचे आयोजन केले होते. यावेळी साऊंड सिस्टम, लेजर शो हे खास आकर्षण ठरले. या शोभा यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालुन सुरूवात झाली. कासारवाडी मधील सर्व तरुणांनी याचे नियोजन केले होते. ही मिरणणुक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.






















Join Our Whatsapp Group