पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २० आणि ३० च्या काही भागातील पहिल्या फेरीचा प्रचार पूर्ण झाला आहे. बुधवारी पहिल्या प्रचार रॅलीचा शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे यांच्याकडे या प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्यात मावळ लोकसभेची खरी टक्कर होणार असून मावळची जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आहे. कासारवाडी परिसरातील प्रचाराची जबाबदारी नगरसेवक शाम लांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रभागातील रॅलीत माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, तुकाराम भुजबलकर, माजी नगरसेवक एकनाथ मोटे यांच्यसह महिलावर्ग तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या भागातील कुंदन नगर, मायानगरी, मंत्री हाऊस, जुने कुंदन नगर, विशाल कॉम्प्लेक्स, पार्सुनाथ सोसायटी, कासुरी गावठाण, हिराबाई वस्ती, कुलीस्थान नगर आदी परिसरात प्रचार रॅली काढून प्रसिद्धी पत्रके वाटप करण्यात येत आहे. या प्रभागात २५ मतदार केंद्र असून या मतदार केंद्रांमध्ये राष्ट्रवादीकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. घरोघरी जाऊन प्रचारातून राष्ट्रवादीचे ध्येयधोरणाविषयी माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. कासारवाडी हा भाग मावळ लोकसभा मतदार संघात येत असून या परिसरात २५ ते २६ हजार मतदार संख्या आहेत. या प्रभागांमधून सर्वाधिक मताधिक्य राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास नगरसेवक शाम लांडे यांनी व्यक्त केला आहे.





















Join Our Whatsapp Group