पिंपरी (Pclive7.com):- भाजप-शिवसेना महायुतीचे मावळातील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरमधील शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधातील प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शुभारंभ केला आहे. मनसैनिक घरोघरी जाऊन बारणे आणि आढळराव यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. महायुती का नको याचा प्रचार देखील डिजिटल गाडी करणार आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहराचे प्रभारी रणजीत शिरोळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजू सावळे, शहरसचिव रूपेश पटेकर, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, मयुर चिंचवडे, संजय यादव, संघटक सुशांत साळवी, विष्णु चावरिया, उपविभाग अध्यक्ष सचिन मिरपगार, अक्षय करांडे, तेजस दाते, अजय कुदळे, मिलिंद सोनवणे, सुरेश सकट, नीलेश नेटके, प्रभाग अध्यक्ष रवि जाधव, सुरज जाधव, राजेश अवसरे, कौस्तुभ देशमुख, प्रतीक शिंदे, गणेश वाघमारे, विक्की कांबळे, अमोल करे, अक्षय खामकर, शिशिर महाबळेश्वरकर, महिला सेनेच्या स्नेहल बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, रुपा गिलबिले, सुजाता काटे, सुनीता माळवदकर, मुमताज शेख, शोभा चावरिया यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात हाक दिली आहे. त्यानुसार मनसेने भाजप आणि शिवसेना महायुतीच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात मनसैनिक कामाला लागले आहेत. मोदी, शहा यांच्या सोबत श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव का नको आहेत हे मनसैनिक जनतेला समजावून सांगणार आहेत. भाजपमुळे जनतेला होत असलेला त्रास उलगडून सांगणार आहेत. शहरात दुचाकी रॅली पदयात्रा काढल्या जाणार आहेत. कॉर्नर सभा, बैठका घेतल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये प्रचाराची डिजिटल गाडी देखील फिरणार आहे. त्याच्या माध्यमातून मोदी यांचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडला जाणार असल्याचे रणजित शिरोळे यांनी यावेळी सांगितले.





















Join Our Whatsapp Group